2022 -2023 आर्थिक वर्षासाठी अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता कर्मचारी हिस्सा व निधी वितरीत करण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
DCPS/NPS Latest updates
जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेची कार्यपध्दती लागू केली आहे.
सदर योजनेसाठी शासनाचा हिस्सा व व्याजासाठी लेखाशीर्ष उघडण्यात आलेली आहे.सन 2022 – 2023 मध्ये कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी विभागाने केलेली पुरवणी मागणी हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आली होती.आता सदर लेखाशीर्षाखाली निधी वितरीत करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने केला आहे.
डीसीपीएस खात्यात किती रक्कम जमा होणार व शासन निर्णय येथे पहा
Dcps amount intrest
सन 2022 -2023 या आर्थिक वर्षाकरिता कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी विवरणपत्रातील तरतूद करण्यात आली आहे.
सदर मंजूर तरतूदच्या 50% रक्कम रु 349,47,05,500/- (रुपये तीनशे एकोणपन्नास कोटी सत्तेचाळीस लाख पाच हजार पाचशे फक्त) इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (BEAMS) द्वारे आयुक्त,शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना खालील विवरणपत्रानुसार वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आठव्या वेतन आयोगाच्या वाढणार पहा ‘एवढा’ पगार