Old pension : महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकारमधील मंत्री ना.दिपक केसरकर यांनी दिल्लीचा दौरा केला असून त्यामध्ये जुन्या पेन्शन योजनेवर सखोल चर्चा झाल्याचे समोर येत आहे.
ओल्ड पेन्शन स्कीम अपडेट्स
महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सरकारी कर्मचारी व आगामी काळातील निवडणुकांसंदर्भात महत्त्वाच्या बाबी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी पटवून दिल्या असल्याची माहिती आहे.
आगामी काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका असून मध्यंतरी सरकारी कर्मचारी अंदोलनाचा धसका घेऊन राज्य सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन लागु करण्यासाठी अभ्यास समितीकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.हा प्रस्ताव 15 जून पर्यंत सरकार समोर मांडला जाणार आहे.
जुनी पेन्शन योजना लागू होणार!
महाराष्ट्र राज्य हे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याने महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्यास BJP चा मोठा राजकिय पराभव मानला जाणार आहे.
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे.सदर समितीबरोबर चर्चेसाठी उपस्थित राहणेबाबत जुनी पेन्शन हक्क संघटना व इतर राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
घरात ठेवा एवढी कॅश, अन्यथा येईल आयकर विभागाची नोटीस