Old pension : महाराष्ट्र राज्य शासनाकडून सध्या जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीस दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
जुनी पेन्शन अभ्यास समितीचा अहवाल सादर होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने खालील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS ) लागू करणे संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय पेन्शन योजना अपडेट्स
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद,नगरपंचायत आणि औद्योगिक नागरी राज्यसेवा कर्मचाऱ्यांना “राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना” (NPS) महाराष्ट्र राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.या संदर्भात नगर विकास विभागाच्या वतीने सविस्तर परिपत्रक जारी करण्यात आला आहे.
सदरील परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यातील दि.31 ऑक्टोबर 2005 च्या शासन निर्णयान्वये दि.01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा यानंतर महाराष्ट्र राज्य शासन सेवेत नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना DCPS ऐवजी आता राष्ट्रीय पेन्शन स्किम NPS लागू करण्यात आले आहे.
NPS DCPS updates
आतापर्यंत सदरील कर्मचाऱ्यांना DCPS योजना लागू होती, आता राज्यातील नगरपरिषद,नगरपंचायत आणि औद्योगिक नगर राज्यसेवा मधील कर्मचाऱ्यांना NPS योजना लागू करण्यात आली आहे.सदर निर्णयाचा फायदा नगर जिल्ह्यातील पालिका त्याचबरोबर नगरपंचायतीमधील वरील नमूद कर्मचाऱ्यांना होणार आहे.