State Employee News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.राज्य शासकीय पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या तंदुरुस्ती भत्याबाबत ही माहिती आहे.
महाराष्ट्र पोलीस कर्मचारऱ्यांना तंदुरुस्ती भत्ता
महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना आपल्या फिटनेस वर विशेष लक्ष द्यावे लागते.महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला मात्र 250 रुपये प्रति महिना एवढा तंदुरुस्ती भत्ता दिला जातो.
तंदुरुस्ती भत्ताच 1985 नंतर तंदुरुस्त झाला नसल्याचे चित्र सध्या असून पोलीस कर्मचाऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
तंदुरुस्ती भत्ता (Fitness Allowance) एवढा कमी असल्याने 95 % कर्मचारी fitness भत्ता घेत नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकारी वर्ग कशा पद्धतीने फिट राहील हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
Fitness allowance rules
महाराष्ट्र राज्य शासनाकडून सन 1985 साला पासून तंदुरुस्ती भत्ता (fitness allowance) पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना देऊ केला जात आहे. त्यावेळी साहजिकच 250 रुपये तंदुरुस्ती भत्ता समाधानकारक होता.
सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
1985 च्या तुलनेत महागाई कितीतरी अधिक पटीने वाढली आहे.यामुळे 2023 मध्ये सुद्धा अडीचशे रुपये तंदुरुस्ती भत्ता मिळत आहे.
सरकारी कर्मचारी तंदुरुस्ती भत्ता
फिटनेस भत्ता 250 रुपये तंदुरुस्ती भत्ता मिळवण्यासाठी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी police मुख्यालयाकडून सूचना पत्र निर्गमित केली जाते.सूचना पत्र जारी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना विहित नमुना अर्जात बिनचूक माहिती भरावी लागते.
अर्जाची समितीच्या माध्यमातून अर्ज पडताळणी केली जाते आणि मग fitness भत्ता सदर कर्मचाऱ्यांना पात्र ठरल्यानंतर वर्ग केला जातो.
पोलीस कर्मचाऱ्यांना डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. Then वेतनात हा फिटनेस भत्ता वर्ग केला जातो.त्यामुळे पोलीस कर्मचारी हा तंदुरुस्ती भत्ता न घेतलेला बरा अशी भूमिका घेतात.
आपला सिबिल स्कोअर फ्रि येथे पहा
1 thought on “State Employee News : धक्कादायक… ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळतोय फक्त 250 रुपयाचा तंदुरुस्ती भत्ता! 1985 पासून भत्यात वाढच नाही?”