State employees : तामिळनाडूच्या विधानसभेत अखेर 12 तास ड्युटी विधेयकाला मंजूरी मिळाली आहे. तामिळनाडू विधानसभेने कारखाना कायदा 2023 मंजूर केला.कायद्याअंतर्गत राज्यातील कारखान्यांमधील काम करणार्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबाबत लवचिकता स्वीकारण्याची तरतूद करण्यात आली आहे
Stateb Employees breaking news
तामिळनाडू राज्यातील कारखान्यातील कर्मचाऱ्यांची ड्युटी ८ वरून १२ तासांपर्यंत वाढवता येणार आहेत.तामिळनाडूच्या द्रमुक सरकारने शुक्रवारी कारखाने विधेयक २०२३ मंजूर केले.या विधेयकामुळे आता ८ तासांची शिफ्ट वाढवून १२ तासांपर्यंत करण्यात येणार आहे.
कामासाठी चार दिवसांचा आठवडा हा पर्याय निवडल्यास ही शिफ्ट वाढवली जाणार आहे.पण विधेयकावर सरकारमधील घटक पक्ष आणि विरोधकांनी जोरदार टीका केल्यामुळे तामिळनाडू सरकारने आता कामगार संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करण्याचा मार्ग निवडला आहे.
कर्मचाऱ्यांना 4 दिवसाचा आठवडा
सरकारच्या या निर्णयाला विरोधी पक्षाने विरोध केला.तामिळनाडूचे उद्योगमंत्री थंगम थेन्नारसू यांनी या कर्मचाऱ्यांकडे आता आठवड्यातून ४ दिवस काम करण्याचा आणि तीन दिवस सुट्टी घेण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.
उरलेल्या तीन दिवसांच्या रजेचे पैसे दिले जातील आणि रजा, ओव्हरटाईम आणि पगार इत्यादींबाबतच्या सध्याच्या नियमांत कोणताही बदल होणार नसुन कर्मचाऱ्यांच्या इच्छेविरुद्ध कामाची सक्ती करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल.
केंद्राचा प्रस्ताव १३ राज्यांनी स्वीकारला
केंद्र सरकारने नुकतेच सर्व राज्य सरकारांना कर्मचाऱ्याच्या ड्युटीचे दिवस आठवड्यातून ४ पर्यंत कमी करण्याबाबत आणि कामाचे तास ८ वरून १२ करण्याचे आवाहन केले होते.अनेक राज्यांनी केंद्र सरकारच्या या आवाहना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.
EPF अंतर्गत अधिक पेन्शन मिळणार, येथे करा अर्ज
1 thought on “State employees : ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना ४ दिवस काम, ३ दिवस सुटी! विधानसभेत विधेयक मंजूर”