Mahadbt portal : महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फ राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर भरण्याची व सोडतीची मुदत १५ मे पर्यंतच असल्याचे सांगितले जात होते.१५ मे नंतर जवळपास २ ते ३ महिने ऑनलाइन शेतकरी निवड सोडत होणार नाही, अशा आशयाचे खोटे संदेश आणि माहिती विविध समाज माध्यमांवर पसरविण्यात येत होती. याविषयी मोठी अपडेट्स समोर आली आहे.
महाडीबीटी पोर्टल ऑनलाईन अर्ज 2023
कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला जाणाऱ्या ‘महाडीबीटी’वरील अर्जाची १५ मे नंतर सोडत होणार नाही,असा मेसेज गेल्या आठ दिवसांपासून सोशल माध्यमातून फिरत होता. मात्र हा संदेश खोटा आणि खोडसाळपणाने प्रसारित केला जात असल्याचे समोर आले आहे.
आयुक्तालय अथवा शासन स्तरावरून असा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही,असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. शेतीविषयक साहित्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी’वर अर्ज नोंदणी सुरू ठेवावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
महाडीबीटी पोर्टल 2023
अशा प्रकारचा कोणताही संदेश आणि माहिती कृषि विभागामार्फत देण्यात आलेला नसल्याने महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असून अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येणार असल्याचे कृषि विभागाने कळवले आहे.
शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर जमा झालेल्या अर्जाचा विचार करून आठ ते पंधरा दिवसाला सोडत काढली जाते. सोडत होणार नाही, अशा संदर्भात कसलाही आदेश वरिष्ठ पातळीवरून आलेला नाही. शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज करणे सुरू ठेवावे. – सुधाकर बोराळे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर
महाडीबीटी पोर्टल ऑनलाईन अर्ज येथे दाखल करा