Documents For Admission : दहावी – बारावी नंतर पुढील प्रवेशासाठी लागतात ‘ही’ प्रमाणपत्रे! येथे पहा सर्व यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Documents After SSC : अकरावी, इंजिनीअरिंग डिप्लोमा, पदवी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनुसूचित जाती,जमातीसाठी तसेच इतर मागासवर्गीयांसाठी काही जागा राखीव असतात.कमी उत्पन्न गटातील पालकांच्या पाल्यांसाठी,अपंग विद्यार्थ्यांसाठी व अन्य काही आरक्षित घटकांसाठी फी माफीच्या सवलती देखील असतात. 

सदरील आरक्षण व फि सवलत फायदा घेण्यासाठी आवश्यक ती प्रमाणपत्रे संबंधित सरकारी कार्यालयातून प्राप्त करावी लागतात. त्याशिवाय याचा लाभ घेता येत नाही. प्रवेशाच्या वेळी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रमाणपत्रांची माहिती आपण जाणून घेऊया.

जात प्रमाणपत्र ( Caste certificate) 

राखीव जागांचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र घ्यावे लागते.बोगस प्रमाणपत्र देऊन कोणी या आरक्षणाचा फायदा घेऊ नये, यासाठी जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यावी लागते.जातीचे प्रमाणपत्र जलद गतीने देण्यासाठी तहसीलदार कार्यालयात सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. 

जात पडताळणी प्रमाणपत्र ( caste validity certificate)

केवळ जात प्रमाणपत्र मिळवून चालत नाही. या प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यावी लागते. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये एकूण १५ विभागीय जात पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडे विहीत नमुन्यात अर्ज दाखल करुन आपण जात वैधता प्रमाणपत्र काढू शकतो.

हे पण पहा ~  Government employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तीन शासन निर्णय निर्गमित! शासन निर्णय दि.7/6/2023

वय अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला (Domicile certificate) 

इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी अधिवास प्रमाणपत्र नसले तरी चालते.त्याऐवजी अकरावी व बारावीची परीक्षा महाराष्ट्रातून दिली असल्याचा पुरावा,तसेच जन्म महाराष्ट्रात झाल्याचा पुरावा असला तरी चालते.वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी मात्र अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र आवश्यक ठरते.विहीत नमुन्यात तहसीलदाराकडे अर्ज करुन हे प्रमाणपत्र कार्यालयातून प्राप्त करता येते.

उत्पन्नाचा दाखला (income Certificate)

विविध अभ्यासक्रमांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासवर्गासाठी (ई.बी.सी.) फी माफीच्या योजना उपलब्ध असतात.इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी ट्यूशन फी वेव्हर योजना, राजर्षी शाहू शिष्यवृती यासारख्या योजनांसाठीही चालू वर्षीच्या उत्पन्नांचे प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून घेणे आवश्यक असते.

आता ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार बिनव्याजी 20 रुपये कर्ज, पहा सविस्तर

बिनव्याजी कर्ज

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment