Employee : महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ च्या नियम १०( ४ ) व नियम ६५ अनुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी / कर्मचा-यांना वयाच्या ५०/५५ व्या वर्षी अथवा ३० वर्षे अर्हताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी त्यांची सेवा पुनर्विलोकन करण्यासंदर्भात शासनाचे धोरण होते.
सरकारी कर्मचाऱ्यांचे होणार सेवा पुनर्विलोकन
आजच्या शासन निर्णयान्वये विभागीय पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली होती. सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णयान्वये पूर्वीचे सर्व आदेश अधिक्रमित करुन पुनर्विलोकन कार्यपध्दतीसंदर्भात तरतुदी केल्या आहेत.सदर शासन निर्णयामध्ये खालील तरतुदी आहेत.
1) गट-अ आणि गट-ब राजपत्रित अधिकारी :-
सेवेत ३५ व्या वर्षापूर्वी आलेले अधिकारी / कर्मचारी
अ) शासन वयाच्या : सामान्य प्रशासन विभागाच्या सुधारित धोरणानुसार शासन सेवेत वयाच्या ३५ व्या वर्षापूर्वी आलेल्या गट “अ” आणि गट-“ब” च्या राजपत्रित अधिका-यांचे त्यांच्या वयाची ५० वर्षे पूर्ण होतेवेळी किंवा त्यांच्या अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पूर्ण होतेवेळी यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी एकदाच पुनर्विलोकन करावयाचे आहे.
सरकारी कर्मचारी महागाई भत्ता, वेतन आयोग, शासन निर्णय, सरकारी योजना संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सऍप गृप जॉईन करा
ब) शासन सेवेत ३५ वर्षानंतर सेवेत आलेले अधिकारी / कर्मचारी :- शासन सेवेत ३५ वर्षानंतर सेवेत आलेल्या राजपत्रित अधिका-यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी पुनर्विलोकन करावयाचे आहे.
Employees service review
2) गट-ब (अराजपत्रित), गट क आणि गट ड चे कर्मचारी :- गट “ब” (अराजपत्रित), गट “क” आणि गट “ड” कर्मचा-यांच्या बाबतीत त्यांच्या वयाच्या ५५ व्या वर्षी किंवा त्यांच्या अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पूर्ण होतेवेळी यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा पुनर्विलोकन करावयाचे आहे.
3) पुनर्विलोकन करताना शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची शासन सेवा पुढे चालू ठेवण्याची पात्रापात्रता आजमावण्यासाठी विहित निकषांच्या आधारे त्यांचे पुनर्विलोकन करुन, सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी / कर्मचारी यांनाच लोकहितास्तव शासन सेवेत पुढे चालू ठेवावयाचे आहे व अकार्यक्षम तसेच संशयास्पद सचोटी असणा-या अधिकारी / कर्मचारी यांना मुदतपूर्व सेवानिवृत्त करावयाचे आहे.
4) प्रत्येक कॅलेंडर वर्षात दिनांक १ ऑगस्ट रोजी पात्रापात्रता तपासण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांची वयाची ४९/५४ वर्षे किंवा अर्हताकारी सेवेची ३०/३५ वर्षे पूर्ण करणे यापैकी जे अगोदर घडेल, त्यावेळी त्यांची सूची तयार करणे अपेक्षित असून कॅलेंडर वर्षाच्या शेवटपर्यंत (म्हणजे ३१ डिसेंबर पर्यंत) विभागीय पुनर्विलोकन समिती, विशेष पुनर्विलोकन समिती व अभिवेदन समिती यांनी कार्यवाही पूर्ण करणे अपेक्षित आहे.
‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन आदेशानुसार सेवेमध्ये पुनर्स्थापित करून मिळणार थकित वेतन!
Je bratachar kartat karmchari tyanach sewat pude thevnyat yeil. Je karmchari a karyasham ahe te adhikari tyana paise deun kayam karun ghetil ya deashat Satya sampale ahe