Save money : महिन्याभराच्या पगारातून पैसे वाचवणे हे सगळ्यांनाच जमते असे नाही. वाढत्या महागाईसोबतच महिन्याचं बजेटही वाढत जाते आहे.त्यामुळे महिन्याच्या शेवटच्या दिवसात खिशात आणि अकाउंटमध्ये पैसेच उरत नाहीत.पण हीच समस्या जाणून आम्ही तुमच्यासाठी बचत करण्यासाठी काही खास उपाय लेखात आपण पाहणार आहोत.
पैशाची बचत का करावी?
आज पैसे तर आपण सगळेच कमावतो पण त्या कमावलेल्या पैशांची बचत करणारे खुपच मोजके जण असतात.कारण आपल्यातील काही जण अशा मतांचे असतात की आजचा आलेला सर्व पैसा आपल्या दैनंदिन गरजा पुर्ण करण्यात,हौसमौस चैनचंगळीच्या वस्तु खरेदी करण्यात आजच खर्चुन टाकतो.
कारण उद्या कोणी बघितला आहे.ही गोष्ट नक्की आहे मित्रांनो की उद्या काय होईल हे आपण काहीच सांगु शकत नाही.म्हणुन आपण नेहमी वर्तमानाचा आनंद घ्यायला हवा वर्तमानात जगायला हवे.
“दर महिन्याला आपण ठरवतो की पुढच्या महिन्यापासून सगळे वायफळ खर्च बंद आणि बचत सुरु करू करायची” पण ते काही जमता जमत नाही आणि बचतीचे गणितही काही जुळत नाही.प्रत्येक महिन्याच्या शेवटी तर सतत धास्ती असते की कुठला इमर्जन्सी खर्च नको यायला, नाहीतर पंचाईत व्हायची.
आपल्या गरजा ह्या खुप मोजक्याच असतात ज्या आपण काही पैशातच भागवू शकतो.पण आपली हौस मौस अधिक प्राप्त करण्याचा हावरटपणा हा आपल्याला गरज नसलेली वस्तु देखील खरेदी करण्यास भाग पडत असतो.म्हणुन आपण कुठलीही वस्तु खरेदी करण्याआधी स्वताला एक प्रश्न विचारायला हवा.
पैशाची बचतीचे सोपे उपाय येथे पहा
3 thoughts on “Save money tricks : खिशात पैसे टिकत नाहीत? पहा उपाय आणि अशी करा पैशाची बचत”