Employees demotion : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आज दिनांक 23.6.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
सदरील निर्णयाद्वारे आता खालील पदोन्नती मिळालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पदोन्नती रद्द करण्यात येऊन त्यांना मूळ पदावर पदस्थापना देण्यात येणार आहे. तर बघूया सविस्तर शासन निर्णय
या सरकारी कर्मचाऱ्यांची पदोन्नती रद्द
विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षकांची कमतरता विचारात घेऊन,विज्ञान विषय घेऊन इ. १२ वी वी परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना मान्यताप्राप्त मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त करण्यास प्रवृत्त करावे.शिक्षकांची पदस्थापना विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षकाच्या जागेवर करण्यात यावी आणि प्रत्यक्ष पदवी प्राप्त करेपर्यंत त्यांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यात येऊ नये, अशी तरतूद शालेय शिक्षण विभाग, शासन परिपत्रक क्रमांक वेतन १२१६/प्र.क्र.१२३/१६/ टीएनटी-३, दि. १३.१०.२०१६. परिपत्रकान्वये करण्यात आली होती.
शिक्षकाची एका स्तरामधून दूसऱ्या स्तरामध्ये पदोन्नती करताना एनसीटीई ने निश्चित केलेली किमान अर्हता धारण करणे आवश्यक आहे. यामधील तरतुदीनुसार इ. ६ वी ते ८ वी वर्गाकरीता असलेली प्रशिक्षीत पदवीधर अर्हता, तसेच सद्यस्थितीत विज्ञान शाखेतील पदवीधर उमेदवारांची उपलब्धता विचारात घेता, शासन परिपत्रक दि. १३.१०.२०१६ मधील अ. क्र. ६ येथील तरतुद कालबाह्य ठरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे.
Employees demotion updates
शासन परिपत्रक दिनांक १३.१०.२०१६ मधील अ.क्र. ६ येथील तरतूद वगळण्यात येत असुन, सदर तरतुदीनुसार विज्ञान विषय घेऊन इ. १२ वी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर सदर परिपत्रकाच्या दिनांकापर्यंत या शिक्षकांनी पदवी अर्हता धारण केली नसल्यास, अशा शिक्षकांची पदस्थापना मूळ पदांवर करण्यात येणार आहे.
पदोन्नती रद्द शासन निर्णय येथे पहा – शासन निर्णय
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०६२३१३२२१६६०२१ असा आहे.हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
बापरे.. सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता होणार बंद