Employees increments : सन २००९ आणि सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक दिनांक २४ ऑगस्ट, २०१७ अन्वये राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना अतिउकृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्यात येवू नयेत शासन निर्णय घेण्यात आला होता.
‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ
राज्यातील जिल्हा परिषदामधील अधिकारी/कर्मचारी यांना अतिउकृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजुर न करण्याचे सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आले होते.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
आता सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयांच्या विरोधात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशास अनुसरुन सामान्य प्रशासन शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केला आहे.ग्राम विकास विभागाच्या शासन आदेशान्वये राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर, २००६, २००७ व २००८ या वर्षाच्या आगाऊ वेतनवाढी मंजूर केलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनश्रेणीत वेतन निश्चिती करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
आगाऊ वेतनवाढ कोणाला मिळणार येथे पहा
Government employees news
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील सर्व अधिकारी/ कर्मचारी यांना लागू करण्यात येत आहे.सर्व जिल्हा परिषदांनी सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करुन,संपूर्ण राज्यभरात आगाऊ वेतनवाढीच्या अनुषंगाने चालू असलेल्या न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्याची मा.न्यायालयास विनंती करण्यात येणार आहे.
आगाऊ वेतनवाढ संदर्भात शासन निर्णय येथे डाऊनलोड करा