Family pension : परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृतीवंतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुणता निवृत्तीयतन मंजूर करण्यासंदर्भात 31 मार्च 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता.
कुटुंब निवृत्तीवेतन योजना
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचान्याला रुग्णता निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
शासन निर्णयातील तरतुदी दिनांक 1/12/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन संवंत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मच्याऱ्यांना लागू असणार आहे.
Family pension pdf forms
दिनांक 1/12/2005 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतचा विकल्प नमुना क्रमांक 3 कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागणार आहे.
शासन निर्णयामधील नमूद तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ अंतर्गत कुटुंब निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतनाचा लाभ सरकारी कुटुंबाने विहीत विकल्प नमूना दिल्यास नियमानुसार Exit Withdrawal ची कार्यवाही करण्यात येणार आहे.
Employees Gratuity Documents
सर्व सेवानिवृत्त DCPS/NPS कर्मचाऱ्यांना विनाअट 15 लाख रुपये पर्यंत ग्रॅच्युटी मिळणार असल्याने त्यासाठी त्यांना ग्रॅच्युटी चा प्रस्ताव दाखल करावा लागेल.ग्रच्युटी प्रस्ताव नमूना लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.
आता ठरले; ‘या’ दिवशी होणार 42% महागाई भत्ता वाढ
फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी चा प्रस्तावाचा नमुना लवकरच उपलब्ध होणार आहे.तोपर्यंत मयत कर्मचाऱ्यांचे मूळ मृत्यू दाखला,मूळ वारस प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे कुटूंबाने तयार ठेवावे.
कुटुंब निवृत्तीवेतन व ग्रॅच्युटी फॉर्म येथे डाऊनलोड करा