Government employees : सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन,सेवा उपदान रजा अंशराशीकर,सातवा वेतन आयोग फरक अदा करणे संदर्भात महत्त्वाचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून त्यावर तात्काळ कार्यवाही होणार आहे.पाहूया सविस्तर माहिती
Gov employees 7th Arrears
राज्य सरकारी सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन,मृत्यु नि सेवा उपदान,अंशराशीकरण इ.रक्कम प्राध्यान्याने अदा करणे आवश्यक आहे.जिल्हा परिषद व मनपा/नपा/नप/कटक मंडळे यातील सेवानिवृत्त शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे त्यांना मृत्यु नि सेवा उपदान अंशराशीकरण इ.देय असलेल्या रकमा अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.
संचालनालयाने सन २०२३-२४ मध्ये सेवानिवृत्त होणारे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती नंतर देय लाभाबाबत गणना करून आवश्यक तरतूदीची मागणी सोबत जोडलेल्या विवरण पत्रात ०२ दिवसांत अन्वये उपरोक्त माहिती दोन दिवसात सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.
प्रलंबित वेतन भत्ता, फरक,उपदान मिळणार
परंतु अद्याप जिल्हा परिषद व मनपा/नपा/नप/कटक मंडळे यातील सेवानिवृत्त शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत मृत्यु नि सेवा उपदान, अंशराशीकरण, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच उपत्याची माहिती सादर करण्यात आलेली नव्हती.
आता उद्या शिक्षण सहसंचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे-१ संचालनालयास समक्ष सादर करण्यात यावी.उपरोक्त माहिती विहित कालमर्यादित प्राप्त न झाल्यास मागणी अभावी निधी उपलब्ध होण्यासाठी अडचणी येऊ शकतात.
जिल्हा परिषद व मनपा/नपा/नप/ कटक मंडळे यातील सेवानिवृत्त शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे लाभ अदा न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व २) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व यांच्या वर राहणार आहे.
सेवानिवृत्ती वेतन,सेवा उपदान,रजा अंशराशीकर,सातवा वेतन आयोग फरक शासन परिपत्रक येथे डाऊनलोड करा