Personal Loan : आजपर्यंत बँकांमार्फत वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड लोन घेण्याची प्रक्रिया सुलभ होती; पण आता रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांमुळे पर्सनल लोन घेणे आणि क्रेडिट कार्डावर लोन घेणे सोपे राहणार नाही.आता अशी कर्ज देण्यापूर्वी ग्राहकांचा आर्थिक इतिहास तपासला जाणार आहे.
वैयक्तिक कर्जासाठी पुर्वी ग्राहकांची पार्श्वभूमी तपासली जात नव्हती. तसेच काही तारण ठेवण्यासही सांगितले जात नव्हते. परंतु आता नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. पर्सनल लोन काहीही तारण न ठेवता आणि तुलनेने लवकर मिळत होते. त्यामुळे त्याचे व्याजदर अन्य कर्जांच्या तुलनेत अधिक असायचे.
Personal lian credit card new rule
RBI नवीन नियमांनुसार, ग्राहकांना personal loan घेण्यासाठी हमी आवश्यक आहे. सोप्या प्रक्रियेमुळे पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन घेण्याचा कल झपाट्याने वाढला आहे. यासोबतच अशाप्रकारचे कर्ज बुडवणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. या कर्जांमध्ये ग्राहकांकडून हमीपत्र घेतले जात नसल्याने बँकांना तोटा सहन करावा लागत आहे.
आता रिझर्व्ह बँकेने नवीन नियम केला आहे की पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड लोनसाठी ग्राहकांची आर्थिक परिस्थिती इतिहास आधी पाहिली जाणार आहे.त्यासोबत हमीपत्र घेणेही आवश्यक असणार आहे.
वैयक्तिक कर्ज आकडेवारी?
कोरोना महासाथीनंतर वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डाद्वारे देण्यात येणाऱ्या कर्जात वाढ झाली आहे. हे लवकर उपलब्ध होतात आणि त्याची प्रक्रियाही सोपी आहे.
२०२२ मध्ये पर्सनल लोन घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.यात ७.८ कोटींवरून ९.९ कोटींपर्यंत वाढ झाली. इतकंच नाही तर क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेणाऱ्यांची संख्याही १.३ लाख कोटींवरून १.७ लाख कोटी झाली आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्येही पर्सनल लोन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढती महागाई पाहता येत्या काळात थकबाकीदारांची संख्या वाढण्याची भीतीही RBI ने व्यक्त केली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने नवीन नियम बनवून वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड कर्जाचे नियम अधिक कडक केले आहेत.
पर्सनल लोन व क्रेडिट कार्ड घेताना घ्या हि काळजी