ops strike leave : संपकालीन कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात महत्त्वाची अपडेट्स समोर! लवकरच मिळणार प’गार…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oops strike leave : मार्च २०२३ च्या पगारातून संपकालावधीचा पगार कापला जाणार नसुन संपकालीन कर्मचार्‍यांकडून “असाधारण रजेचा सुधारित शासन निर्णय येईपर्यंत माहे मार्चच्या प’गारातून वेतन कपात करु नये,सुधारित शासन निर्णय न आल्यास माहे एप्रिल २०२३ च्या पगारातून संपकालावधीचा प’गार कपात करणेस हरकत नसल्याचे हमीपत्र घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वे’तन निघणार आहे.

State employees latest news

कोल्हापूर कोषागार कार्यालयाने ” जर असाधारण रजेचा सुधारित शासन निर्णय न आल्यास संपकालीन कर्मचार्‍यांच्या माहे एप्रिल २०२३ च्या पगारातून संपकाळाचा प’गार कपात करणेत येईल असे हमीपत्र जोडून मार्च २०२३ ची पगार बिले सादर करावीत, ती पारीत (मंजूर) करणेत येतील,कुणाचाही असे स्पष्ट आश्वासन दिले आहे.

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

रमजान ईद हा महत्वाचा सण असल्याने ईदपूर्वी वे’तन अदा होईल या दृष्टीने एक वेळची विशेष बाब म्हणून खालील वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करण्यात यावे असे निर्देश दिले आहे.

Government employees ops updates

दिनांक १४ मार्च २०२३ ते २० मार्च २०२३ या संप कालावधीत ०७ दिवसांचा कालावधी सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय दिनांक २८ मार्च २०२३ नुसार संपामध्ये जे शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले होते त्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता असाधारण रजा म्हणून नियमीत करण्यात यावे असे नमुद आहे.

हे पण पहा ~  Bank New Rules : आता 'या' कागदपत्रांशिवाय निघणार नाही बॅंकेतील पैसे! तर घरात ठेवत येणार एवढे पैसे?

उपरोक्त शासन निर्णय दिनांक २८ मार्च २०२३ चे अनुषंगाने सुधारीत शासन आदेश निर्गमीत न झाल्यास संपात सहभागी असलेल्या कर्मचान्यांचे माहे एप्रिल २०२३ च्या वे’तनातून सदर ०७ दिवसांचे वे’तन हे विनावे’तन म्हणून एकरक्कमी कपात करण्यात येईल.

कर्मचाऱ्यांचे हमीपत्र घेऊन निघणार पगार

याबाबत संपात सहभागी असलेले कर्मचारी यांचे लेखी हमीपत्र घेऊन माहे मार्च २०२३ चे संपूर्ण महिन्याचे चे वे’तन अदा करण्यात यावे.सोबत दिलेल्या नमुन्यातील हमीपत्र माहे मार्च २०२३ चे देयकासोबत जोडावे लागणार आहे.

संप कालावधीतील वेतनाबाबत संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे हमीपत्र

हमीपत्र पीडीएफ

संपकाळातील वेतन रजा संदर्भात अपडेट्स

सदर नस्तीवर आज रोजी मा. उपमुख्यमंत्री यांची स्वाक्षरी झाली असून मा. मुख्यमंत्री यांची स्वाक्षरी बाकी आहे.नस्तीवर मा.मुख्यमंत्र्याची स्वाक्षरी होऊन लवकरच आपणा सर्वांना अपेक्षित असलेली कार्यवाही निश्चितच पूर्ण होईल आणि सुधारित शासन निर्णय निर्गमित होईल.

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

4 thoughts on “ops strike leave : संपकालीन कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात महत्त्वाची अपडेट्स समोर! लवकरच मिळणार प’गार…”

Leave a Comment