RBI on ops : देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन (OPS) लागू करण्याची योजना आखली जात आहे.या सगळ्या घडामोडत माजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर यांच्या कडून मोठे वक्तव्य समोर आले आहे.
Old pension scheme news
जुनी पेन्शन योजने बाबत देशभरात विविध चर्चा सुरू असताना देशातील अनेक राज्यांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात आली आहे त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन प्रणाली (OPS) लागू करण्याची योजना आखली जात आहे.या सगळ्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मोठी माहिती समोर आली आहे.
देशातील काही राज्यांनी old pension scheme पुन्हा लागू करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर रिझर्व्ह बँकेने मंगळवारी सावधगिरीचा इशारा दिला आहे.यामुळे राज्यांच्या तिजोरीपुढे मोठे संकट निर्माण होऊन संपूर्ण देशभरात राज्याराज्यात वित्तीय तूट निर्माण होईल, अशी भीती शशिकांत दास यांनी व्यक्त केली आहे.
RBI Governor on ops
यापुर्वी सुद्धू आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत मोठे विधान केले होते.सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यास भारतीय रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी नापसंती दर्शवली आहे.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
सध्या देशभरातील कर्मचारी जुन्या पेन्शनबाबत सरकारविरोधात आंदोलन करत आहेत.एकीकडे कर्मचारी जुनी पेन्शन बहाल करण्याची मागणी सातत्याने करत असताना दुसरीकडे निवडणुकीच्या वर्षात याचा फायदा घेत सरकार कामगार वर्गाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याची मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांसह अनेक राज्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
NPS/DCPS latest updates
कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून अनेक बिगर भाजपशासित राज्यांमध्ये जुनी पेन्शन बहाल करण्यात आली आहे.राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि झारखंडच्या सरकारने कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे. पण भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्य सरकारांच्या या निर्णयाविरोधात इशारा दिला आहे.
NPS अकाउंट मधून पैसे काढण्याचे नियम बदलले! पहा नाहितर अडकतात पैसे