School holiday : महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, यांनी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2023 पी उन्हाळी सुट्टी व 2023-24 सुरु करणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
शाळांचे उन्हाळी सुट्टी वेळापत्रक जाहीर
आपल्या पाल्यांना मंगळवार,दि.02 में 2023 पासून उन्हाळी सुट्टी लागणार असून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि 11 जून 2023 पर्यंत ग्राह्य धरावा लागणार आहे.शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये दुसरा सोमवार, दि. 12 जून, 2023 रोजी शाळा सुरु करण्यात येतील.
जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी संपल्यानंतर शाळा सोमवार दि. 26 जून, 2023 रोजी सुरु होतील.
इ.1 ली ते इ.9 वी व इ.11 वी चा निकाल दि. 30 एप्रिल,2023 रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल.तथापि, तो निकाल विद्यार्थी / पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहणार आहे.
दिवाळी सुट्टी 2023
शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करुन त्याएवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्या परवानगीने योग्याबाबत आवश्यक निर्देश आपले स्तरावरुन द्यावेत.
माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्टया 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येणार आहे.
2023
शाळेच्या सुट्टी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,शिक्षणाधिकारी (माध्यमिक),जिल्हा परिषद सर्व,शिक्षण निरीक्षक (उत्तर पश्चिम दक्षिण) यांना कृष्णकुमार पाटील शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या कडून कळविण्यात आले आहे.
उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक सत्र सुरुवात शासन परिपत्रक येथे पहा