State employees : शासकीय परिवहन सेवा कार्यालयातील वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना गृह विभागाच्या संदर्भाधीन दि.३१.०३.१९७९ च्या शासन निर्णयान्वये मानधन अदा करण्यात येत होते.महाराष्ट्र शासन राजपत्र भाग ४ अ, सामान्य प्रशासन विभाग, दि.३०.१२.१९८१ अन्वये शासकीय परिवहन सेवा सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखाली आणले आहे.
Msrtc employees news
शासन निर्णय अद्ययावत करून शासकीय परिवहन सेवा कार्यालयाच्या वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना मानधन सुधारित दराने अदा करण्यासंदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
शासन निर्णयान्वये गृह विभाग क्र. जीटीएस-०६/७७/१-२३ए-६, दि.३१.०३.१९७९ चा शासन निर्णय अधिक्रमित करून शासकीय परिवहन सेवा कार्यालयाच्या वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना (वाहन चालक वगळून) खालील नमूद केलेल्या सुधारित दराने, १० (दहा) दिवसांच्या कमाल मर्यादेच्या अधीन राहून, मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Government employees news
- नियमित कार्यालयीन वेळेकरीता (पहिली शिफ्ट) मानधन नाही
- नियमित कार्यालयीन वेळेनंतर केलेल्या अतिरिक्त पूर्णवेळ एक दिवसाचे मूळ वेतन सेवेकरिता ( दुसरी शिफ्ट)
- सार्वजनिक सुटीच्या दिवशी अथवा weekly off च्या दिवशी एक दिवसाचे मूळ वेतन केलेल्या कामाकरिता (पहिली शिफ्ट)
शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ “मानधन” म्हणजे त्या कर्मचाऱ्याचे एका दिवसाचे मूळ वेतनाइतकी रक्कम राहील.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन, शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
ST employees updates
सदर दर हे हा शासन निर्णय पारीत होण्याच्या दिनांकापासून लागू होतील.वरील बाबींवर होणारा खर्च मागणी क्र. ए-४, २०७०, इतर प्रशासकीय सेवा ११४ परिवहन साधनांची खरेदी व परिरक्षण, (०३) शासकीय परिवहन सेवा (२०७० ०१४७) ०३ – अतिकालिक भत्ता या लेखाशीर्षाखाली वित्तीय वर्षासाठी मंजूर झालेल्या अनुदानातून भागविण्यात येईल.
शासकीय कर्मचारी पगार वाढ व शासन निर्णय येथे पहा