ST Employees : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी, २०२३ देय मार्च, २०२३ चे वेतन अदा करण्यासाठी व माहे जानेवारी, २०२३ चे सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
MSRTC Government employees
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC Government employees) मुंबई उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,यांनी पत्रांन्वये शासनास मासिक पगार संदर्भात विनंती केली होती.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी, २०२३ देय मार्च,२०२३ च्या वेतनासाठी व माहे जानेवारी,२०२३ चे सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी निधी वितरित करण्याचा बाब शासना शासन निर्णय घेण्यात आला आहे.
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना मिळणार पगार!
सन २०२२-२३ मध्ये गृह (परिवहन) विभागाच्या २०४१ ००१८-३३ अर्थसहाय्य लेखाशिर्षाखाली तरतूद करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी, २०२३ देय मार्च, २०२३ च्या वेतनासाठी रू.१००.०० कोटी व माहे जानेवारी,२०२३ चे सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी रु.२२४.७४ कोटी असा एकूण रु.३२४.७४ कोटी (अक्षरी रुपये तिनशे चोवीस कोटी चौन्याहत्तर लक्ष फक्त) एवढा निधी रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
Government employees Maharashtra
सदर रू.३२४.७४ कोटी हा खर्च सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा आणि सदर खर्च “मागणी क्रमांक बी-३. लेखाशिर्ष २०४१. वाहनांवरील कर (००) ००१,संचालन व प्रशासन (०१) परिवहन आयुक्त (०१) (०१) आस्थापना परिवहन आयुक्त, (दत्तमत्त) (अनिवार्य) (२०४१००१८) ३३. अर्थसहाय्य” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात येणार आहे.Government employees Maharashtra
माहे फेब्रुवारी वेतन संदर्भात शासन निर्णय येथे पहा