Dearness allowance : केंद्र सरकारने मागील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 4 टक्क्यांनी वाढून 42 % केला होता. सदरील वाढ जानेवारी 2023 पासून लागू झाली.आता पुढील महागाई भत्ता जुलै 2023 पासून जाहीर होणार असून वाढ देखील 4 % होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अजून वाढलेला नाही, याबद्दल मोठी अपडेट्स समोर आली आहे.
Employee’s DA Hike news
राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ दिली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.काही मीडिया रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून महागाई भत्ता वाढीबाबतचा प्रस्ताव अंतिम केला आहे.केंद्र सरकार प्रमाणे बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत महागाई भत्ता 4 % वाढीचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता कॅल्क्युलेटर
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार सुमारे 42,000 रुपये असेल आणि मूळ वेतन सुमारे 25,500 रुपये असेल,तर अशा कर्मचाऱ्यांला महागाई भत्ता म्हणून 9,690 रुपये मिळतील. डीएमध्ये 4 टक्के वाढ केल्यानंतर 10,710 रुपये महागाई भत्ता देण्यात येत आहे. म्हणजे दर महिन्याला पगारात 1,020 रुपयांची वाढ होणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 45% किंवा 46%
मीडिया रिपोर्ट्सनुसार,जर CPI-IW इंडेक्स 132.7 च्या वर गेला असून जुलैमध्ये आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता मिळत आहे.जर महागाई भत्ता 3% ने वाढला तर एकूण महागाई भत्ता 45 % होईल. जर CPI-IW 4 टक्क्यांनी वाढल्यास महागाई भत्ता 46 % होईल.
18 महिन्याचा थकित महागाई भत्ता फरक मिळण्याचा मार्ग मोकळा
2 thoughts on “Dearness allowance : मोठी बातमी.. बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत होणार शिक्कामोर्तब! तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 46 टक्के ?”