7th pay arrears : सातव्या वेतन आयोग थकबाकीची संदर्भात महत्त्वाची अपडेट्स आली असून कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार आहे.सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा निर्णय आज घेण्यात आला असून त्यासंबंधी यादी खालीलप्रमाणे आहे.
सातवा वेतन आयोग फरक
शासन परिपत्रक वित्त विभाग दि. २०.०२.२०१९ अन्वये विहित केली आहे.तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजन अथवा परिभाषित अशंदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकी रक्कम ५ वर्षांत ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक दि.३०.०५.२०१९ अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
दि.१.१.२०१६ ते दि. ३१.१०.२०२० पर्यंतच्या कालावधीसाठी ज्या कर्मचाऱ्याने निवृत्तीवेतन खात्यामध्ये अगोदरच (असुधारित वेतनानुसार) दिलेली नियमित वर्गणी, सुधारित वेतनसंरचनेत निश्चित केलेले वेतन विचारात घेता नियमांनुसार विहित केलेल्या किमान वर्गणीपेक्षा कमी पडत असेल तर ती थकबाकीच्या रकमेतून वसुल करून त्यावरील शासनाच्या उचित अंशदानासह अशी रक्कम स्तर १ खात्यामध्ये जमा करावी लागणार आहे
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी… घरभाडे भत्ता वाढणार
7th pay commission Arrears
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मवान्यांना दिनांक ०१.०७.२०२१ रोजी देय असलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान करणेबाबत मान्यता दिलेली आहे.
राज्यातील नगरपरिषदांचा जकात कर व महागाई भत्ता रद्द केल्यामुळे त्याऐवजी सदर नगरपरिषदांना सहायक अनुदान वितरित करण्यात येते.या आदेशान्वये परिशिष्ट अ मध्ये नमूद स्थानिक स्वराज्य संस्था यांना ७ व्या वेतन आयोगाच्या ३ रा हप्ताकरीता रक्कम रु. १५३,५२,६९,७१८/- (रु. एकशे त्रेपन्न कोटी वावण्ण लाख एकोणसत्तर हजार सातशे अठरा) वितरीत करण्यात आले आहे.येते.अर्थसंकल्पिय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे.
सातवा वेतन आयोग फरक शासन निर्णय व वाटप यादी येथे पहा