DA Arrears : केंद्र सरकारकडून जुन्या महागाई भत्त्याची (डीए थकबाकी) थकबाकी देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला आहे. उर्वरित 18 महिन्यांचा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) दिला जाणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Dearness allowance hike news
केंद्रीय कर्मचारी जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता वाढण्याची वाट पाहत आहेत.बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए वाढीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.मात्र याच दरम्यान जुन्या डीए थकबाकीच्या मागणीवरून कर्मचाऱ्यांना दणका बसला आहे.
जुन्या महागाई भत्त्याची (डीए एरिअर) थकबाकी देण्यास केंद्र सरकारकडून स्पष्ट नकार देण्यात आला आहे. उर्वरित 18 महिन्यांचा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) दिला जाणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारने लोकसभेत दिली माहिती
लोकसभेत स्पष्ट करण्यात आले की सध्या अर्थसंकल्पीय तूट एफआरबीएम कायद्यातील तरतुदींच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळे डीएची थकबाकी परत देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले,महामारीच्या काळात सरकारने आपत्तीला तोंड देण्यासाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या. त्यासाठी पैशांची गरज होती.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली. सरकारने सांगितले की, कोरोनाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या रोखलेल्या महागाई भत्त्यातून 34,402.32 कोटी रुपये वाचले. हा पैसा साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी वापरला गेला.
2020 मध्ये कोरोना महामारीच्या आगमनानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या dearness allowance वाढीचे तीन हप्ते थांबवण्यात आले होते.जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 नंतर, ते जुलै 2021 मध्ये पुनर्संचयित करण्यात आले.
7th pay commission new updates
जानेवारी 2020, जून 2020 आणि जानेवारी 2021 साठी 17 % DA ची एकवेळ 17% वाढ करण्यात आली.मात्र या कालावधीत रोखून ठेवलेली रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही.
कर्मचारी संघटनेकडून 18 महिन्यांच्या डीए थकबाकीची मागणी सातत्याने केली जात आहे.पण यावर मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA hike आणि DA Arrears देण्यास साफ नकार दिला.
या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 43.3% महागाई भत्ता वाढ