Family pension : परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृतीवंतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचान्याला सरणता निवृत्तीयतन मंजूर करण्यासंदर्भात 31 मार्च 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता.
कुटुंब निवृत्ती वेतन योजना 2023
विभागीय आयुक्त,कोकण, पुणे, नाशिक,औरंगाबाद, अमरावती, नागपूर,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद (सर्व) यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणे संदर्भात ग्रामविकास विभागाकडून मंजूरी देण्यात आली आहे.
Family pension new updates
संदर्भाधीन शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक अनुक्रमे २०२३०४०३१३३३३३०७०५ व २०२३०४२०१६०२११४३०५ असा आहे. सदर शासन निर्णय सर्व जिल्हा परिषदांना लागू करण्यात येत असून त्यातील तरतूदी विचारात घेवून कार्यवाही करावी.
कुटुंब निवृत्ती वेतन नवीन शासन निर्णय व अर्ज pdf येथे पहा