Family pension : महाराष्ट्र राज्यातील पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व अधिनस्त घटक महाविद्यालये/ प्रक्षेत्र / संस्था येथे दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर विद्यापीठ सेवेत नियुक्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुक्रमे नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) लागू करण्यात आली आहे.
कुटुंब निवृत्तीवेतन योजना 2023
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा अंशराशीकर निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ अनुज्ञेय ठरत नाहीत.
वित्त विभागाच्या दिनांक ३१ मार्च, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक ०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू आहे.
Family pension and gratuity
संबधित सरकारी कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान,तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय केले आहे.
कुटुंब निवृत्तीवेतन योजना विकल्प नमुना PDF येथे डाऊनलोड करा